पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत विस्तारीकरण करणे

Launcher erection work in progress at P78 to P79

कास्टिंग यार्डमध्ये सेगमेंट उचलण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Pier Cap Reinforcement Tying Work प्रगतीपथावर आहे.

Pier P254 Shuttering काम प्रगतीपथावर आहे.

सुरक्षा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
- प्रकल्पाची एकूण लांबी =13.90 कि.मी.
- मार्गिका = 6-मार्गिका (3+3 मार्गिका).
- स्पॅनची लांबी = 40 मीटर
- प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा कालावधी : 48 महिने.
- दोष दायित्व कालावधी (DLP): 24 महिने.
- कंत्राटाची रक्कम: रु. 2682 कोटी
सद्य:स्थिती
सध्या उपयुक्तता सेवांचे स्थलांतर (Utility Diversion) आणि Working pile, Pier, Pier cap आणि Segment कास्टिंग चे काम प्रगतीपथावर आहेत
• भौतिक प्रगती : 15.53 %
• आर्थिक प्रगती : 13.83 %
प्रकल्पाचे नाव :- पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंत विस्तारीकरण करणे.
प्रकल्पाची माहिती :-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. 05/03/2024 रोजी झालेल्या 156व्या बैठकीत पूर्व मुक्त मार्ग छेडानगर, घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे या प्रकल्पाच्या प्रस्तावास व यास अपेक्षित ₹. 3314.40 कोटी इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली
सदर प्रकल्प हा 6 पदरी (3+3 पदरी) असून त्याची एकूण लांबी 13.90 किमी आहे. सदर प्रकल्पाचे प्रस्तावित संरेखन हे विद्यमान पूर्व मुक्त मार्गा येथून पुढे रमाबाई/कामराज नगर परिसरातून प्रस्तावित असून पुढे घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जेव्हीएलआर, ऐरोली व मुलुंड हे महत्वाचे जंकशन ओलांडून ठाण्याजवळील आनंदनगर येथे संपतो, नवघर उड्डाणपूलाजवळ 6+6 पदरी टोल प्लाझाची तरतूद, दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शनजवळ, विक्रोळी जंक्शनजवळ 2 पदरी अप-डाउन रॅम्प प्रस्तावित आहेत.
सदर उन्नत मार्गाचा शेवट आनंद नगर, ठाणे येथे होणार असून सदर मार्ग पुढे प्रस्तावित आनंद नगर ते साकेत उन्नत मार्गास मिळणार आहे
मे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडची कंत्राटदार म्हणून नियुक्ती दि. 18/12/2024 रोजी करण्यात आली आहे आणि मे. शेलाडिया असोसिएट्स इंक. आणि मे. एस.एम.ई.सी. इंटरनॅशनल प्रा. लि. दि. 18/12/2024 रोजी यांची संयुक्त भागीदारीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत वित्तपुरवठा करण्यात येत आहे.
काम पूर्णत्वाचा कालावधी = 48 महिने (संकल्पन / पर्यावरणीय मंजुरीचा कालावधी 12 महिने) + (बांधकामाचा कालावधी 36 महिने)
दोष दायित्व कालावधी : 24 महिने.
दोष दायित्व कालावधी : 24 महिने.



