inner-banner

ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत या उन्नत रस्त्याचे बांधकाम करणे.

प्रकल्पाचे नाव : ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत या उन्नत रस्त्याचे बांधकाम करणे.

प्रकल्पाची माहिती :

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दि. 05/03/2024 रोजी झालेल्या 156व्या बैठकीत पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत या प्रकल्पाच्या प्रस्तावास यास अपेक्षित रु. 2188.62  कोटी इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
  • ठाणे शहरामधून पूर्व द्रुतगती महामार्ग जात असून या महामार्गावर ठाणे शहरातील तसेच शहराबाहेर प्रवास करणाऱ्या वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होते. ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका, नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, गोल्डन डाईज जंक्शन (माजिवाडा) या महत्त्वाच्या जंक्शनमधून जातो. तीन हात नाका जंक्शन येथे 6 पदरी उड्डाणपूल, नितीन आणि कॅडबरी जंक्शन येथे कॅडबरी उड्डाणपूल, माजिवाडा जंक्शनवर गोल्डन डाईज उड्डाणपूल आहेत. तीन हात नाका येथे ठाण्यातून येणारे दोन रस्ते आणि एलबीएस मार्गातून येणारे रस्ते आहेत. तसेच, येथे जाण्यासाठी आणि फिरण्यासाठी सेवा रस्ते आणि उड्डाणपुलांचे रस्ते आहेत.मुंबईहून ये-जा होणारी प्रचंड वाहतूक आणि माजिवाडा जंक्शनमुळे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्यामुळे ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग ठाणे शहरात होणारी वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी प्राधिकरणामार्फत आनंदनगर ते साकेत उन्नत रस्त्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
  • मे. जे.कुमार इन्फ्राप्रोजेक्टस लि.ची कंत्राटदार म्हणून नियुक्ती दि. 11/10/2024 रोजी करण्यात आली आहे आणि मे. निप्पॉन कोई इंडिया प्रा.लि. जेव्ही प्रभावी दि. 18/12/2024 रोजी यांची संयुक्त भागीदारीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सदर प्रकल्पासाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत वित्तपुरवठा करण्यात येत आहे.

 

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

  • प्रकल्पाची एकूण लांबी: 8.24 कि.मी.
  • मार्गिका: 6-मार्गिका (3+3 मार्गिका)
  • स्पॅनची लांबी: 40 मीटर
  • प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचा कालावधी: 48 महिने
  • दोष दायित्व कालावधी (DLP): 24 महिने
  • कंत्राटाची रक्कम: रु. 1,847.72 कोटी

सद्यस्थिती

सध्या उपयुक्तता सेवांचे स्थलांतर (Utility Diversion) आणि Working pile, Pile Cap, Pier, आणि Pier cap कास्टिंग चे काम प्रगतीपथावर आहेत.

  • भौतिक प्रगती: 15.31%
  • आर्थिक प्रगती: 14.38%

छायाचित्रे

1

2

×

Rate Your Experience