inner-banner

माता रमाबाई आंबेडकर पुनर्वसन प्रकल्प / अनधिकृत बांधकाम विभाग / झोपडपट्टी पुनर्वसन (ज्युव्ही) प्रकल्प

श्री शिवाजी दावभट,

अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक (.बां.)/

प्रमुख, उच्चस्तरीय तक्रार निवारण समिती (SLGRC)

 

झोपडपट्टी पुनर्वसन (JV) प्रकल्प/.आं.झो.पु.प्र./अनधिकृत बांधकामेया कक्षामार्फत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपडपट्टी धारकांचे पुनवर्सन प्रकल्प करण्याचे नियोजन अनधिकृत बांधकामे परवानगी संबंधी तसेच प्राधिकरणाच्या जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांच्या अपिलाबाबत कार्य केले जाते.

  • माता रमाबाई आंबेडकर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प :-

शासन निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर, मौजे-घाटकोपर (पूर्व), .भू.क्र.194 (भाग), 195 (भाग) येथील अंदाजित 3,31,495.44 चौ.मी. (33.15 हेक्टर) जमिनीवर व्यापलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजना जवळ 17,000 झोपडीधारक/गाळेधारक यांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर झोपडीधारकांचे करारनामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे

) अनधिकृत बांधकामे निष्कासन :-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विशेष नियोजन प्राधिकरण प्रस्तावित क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे निष्कासन करण्याचे MRTP Act प्रमाणे निष्कासनाची कार्यवाही भिवंडी तालुक्यातील 60 गावे, कल्याण ग्रोथ सेंटर मधील 10 गावे, ODC, WTT, BKC/NTDA, MIAL, PNA या मुंबई शहर मुंबई उपनगर क्षेत्रातील विनापरवानगी होणाऱ्या बांधकामावर कारवाई करण्याकरीता मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकाम) म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.

  • उच्चस्तरीय तक्रार निवारण समिती (SLGRC) :-

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विविध प्रकल्प हाती घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अपिल संबंधी सुनावणी उच्चस्तरीय तक्रार निवारण समितीकडे आयोजित करुन त्यांचे निराकरण करण्यात येते.

) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (JV) :-

बृहन्मुंबई महानगर पालिका एम/पूर्व वॉर्ड विभागातील सहा झोपडपट्टी पुनर्वसन (JV) प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. सदर सहा झोपडपट्टी पुनर्वसन योजना समावेश असलेल्या झोपडीधारकांची पात्रता/अपात्रता निश्चित करण्याची कामे एम/पूर्व वॉर्ड विभाग यांच्या स्तरावर करण्यात येणार आहे.

Loading content ...
×

Rate Your Experience