inner-banner

देहरजी मध्यम प्रकल्प

प्रकल्पाची माहिती :-

देहरजी मध्यम प्रकल्प हा पाणी पुरवठा प्रकल्प म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसहाय्यातून राबविण्यात यावा असे मा. मंत्री, जलसंपदा विभाग यांनी दिनांक 14/11/2018 रोजीच्या  बैठकीच्या इतिवृत्तानुसार निर्देश दिलेले आहेत याबाबत महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी सहमती दिली आहे. या संदर्भात जलसंपदा विभाग, शासन निर्णय दि.11/09/2019 नुसार देहरजी मध्यम प्रकल्प वसई-विरार महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांचे आर्थिक स्त्रोतातून कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाने राबविण्या ऐवजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आर्थिक स्त्रोतातून राबविण्यास मान्यता दिलेली आहे.

देहरजी मध्यम प्रकल्प, हा पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे गावाजवळील पश्चिम वाहिनी नदी खोरे समुहातील वैतरणा नदीच्या उपखोऱ्यातील देहरजी नदीवर स्थित आहे. या प्रकल्पांतर्गत देहरजी नदीवर 93.22 ...मी. क्षमतेचे मातीचे संधानकातील धरण प्रस्तावित आहे.

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाने सादर केलेल्या देहरजी प्रकल्पाच्या ₹2599 कोटी रक्कमेच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावास शासन निर्णय क्र. सुप्रमा-2025/(प्र.क्र.22/25) मध्यम प्रकल्प दि. 25/02/2025 अन्वये शासनाकडून मान्यता प्राप्त असून प्राधिकरणाच्या दि. 28/03/2025 रोजीच्या 159 व्या बैठकीत कार्योत्तर मंजूरी देण्यात आलेली आहे.

प्रकल्पाची वैशिष्टे :-

  • देहरजी नदीवर 95.60 ...मी. क्षमतेचे मातीचे संधानकातील धरण प्रस्तावित.
  • उपयुक्त क्षमता : 93.55 ...मी. (255 ..लि. प्रतिदिन)
  • धरणाची लांबी : 2450 मी, उंची – 71.60 मी.
  • धरणाचा प्रकार : माती धरण मध्यवर्ती द्वारयुक्त सांडवा.
  • वक्राकार दरवाजे : 12 मी X 6.5 मी. (4 दरवाजे).

प्रकल्पाची सद्यस्थिती :-

कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाने सन 2006-2007 मध्ये निविदा मागवून देहरजी मध्यम प्रकल्पाच्या कामाचा कार्यारंभ आदेश मे. पी.व्ही.आर. प्रोजेक्टस लि., पुणे यांना दिनांक 27/07/2006 रोजी देण्यात आलेला आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश यांच्या दि. 11/12/2020 च्या पत्रान्वये कामाच्या नियोजनानुसार दि.30/6/2024 पर्यंत तृतीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

  1. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 445.29 हे. वनजमिन हस्तांतरणाच्या प्रस्तावास दि.19/02/ 2016 रोजीच्या केंद्र शासनाच्या पत्रान्वये टप्पा-2 ची मंजूरी प्राप्त आहे.
  2. देहरजी प्रकल्पास आवश्यक जवळपास सर्व सांविधानिक मान्यता प्राप्त आहे.
  3. सदर प्रकल्पामुळे 3 गांवे (खुळेद, साखरे, जांभे) अंशत: बाधित होत आहेत. प्रकल्पबाधीत 272 कुटुंबाच्या पुनर्वसनाची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचे मार्फत प्रगती पथावर आहे.
  4. धरण बुडित क्षेत्रासाठी आवश्यक 234.93 हे. खाजगी भुसंपादनाची कार्यवाही मा. जिल्हाधिकारी, पालघर यांचे मार्फत प्रगती पथावर आहे.
  5. सद्यस्थितीत कंत्राटदाराने माहे मे, 2022 पासून पाया खोदकाम घळ भागात संधानकाचे बांधकाम सुरु केले असून प्रकल्पाची एकंदरीत भौतीक प्रगती 82% आहे.

              प्राधिकरणाने देहरजी प्रकल्पाकरीता आजतागायत भूसंपादनाकरिता ₹364.82 कोटी, ETP चार्जेस करिता ₹5.73 कोटी कंत्राटदाराच्या देयकाची ₹1562.48 कोटी असे एकूण ₹1933.04 कोटी निधी पुरवठा केलेला आहे. सदरचे काम माहे डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे  नियोजन आहे.

प्रकल्पाचे फायदे :-

देहरजी धरण प्रकल्पातून 93.55 ...मी. (255 ..लि. प्रतिदिन) इतका जलसाठा उपलब्ध होणार असून सदर पाणीसाठ्यापैकी 190 ..लि. वसई-विरार महानगरपालिकेने आरक्षित केले आहे. उर्वरित 65 ..लि. पाणी ग्रामीण भागासाठी 15 ..लि. सिडको, पालघर यांना 50 ..लि. प्रतिदिन पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

×

Rate Your Experience