inner-banner

काळू धरण प्रकल्प

प्रकल्पाची माहिती :-

              कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांनी काळू नदीवर, मौजे खापरी, ता. मुरबाडजि. ठाणे येथे काळू धरण बांधावयाचे काम हाती घेतले असून सदर बांधकाम प्राधिकरणाच्या निधीतून पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांची दिनांक 03 ऑगस्ट, 2009 रेाजीच्या 125 व्या बैठकीत 661.01 कोटी रक्कमेस मान्यता दिली आहे.

प्रकल्पाची वैशिष्टे :-

काळू प्रकल्प हा पूर्णपणे पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प असून प्रकल्पांतर्गत 1140 ..ली. प्रतिदिन इतका पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. धरणाची एकूण लांबी 720 मी. इतकी असून सदरच पूर्ण बांधकाम मातीचे आहे. तसेच त्याचा स्पिल वे भाग संधानकामध्ये आहे.     

प्रकल्पाची सद्यस्थिती :-

  • मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रकल्पातील वन जमिनी संदर्भात वन विभागाची परवानगी उपलब्ध नसल्यामुळे धरण बांधकामास दिनांक 2 मार्च 2012 पासून स्थगिती देण्यात आली होती.
  • दिनांक 13 जानेवारी 2020 रोजी मा. उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविण्याचे आदेश दिले आहेत.
  • प्रकल्पातील भूसंपादनाचे काम कोंकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत प्रगतीपथावर आहे.
  • वनजमिनीच्या मान्यतेसाठी वन विभागाकडे NPV (Net Present Value) म्हणून ₹396.44 कोटी रुपये भरण्यासाठी प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • वन विभागाने दिलेली मान्यता 5 वर्षे पूर्ण झाल्यामुळे व्यपगत (लॅप्स) झाली आहे.
  • सदर मान्यता पुनर्जिवित करण्यासाठी कोंकण पाटबंधारे विकास महामंडळामार्फत पुढील पाठपुरावा सुरू आहे.
  • प्राधिकरणाने मंजूर केलेल्या निधीपैकी आतापर्यंत प्रकल्पावर ₹527.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

प्रकल्पाचे फायदे :-

काळू धरणातून 1140 ..ली.प्रतिदिन इतका पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून मुंबई महानगर क्षेत्राच्या पूर्व उपप्रदेशातील ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कुळगांव- बदलापूर, अंबरनाथ आणि त्या भागातील 359 गांवे यांच्या पाणी पुरवठ्यासाठी उपयुक्त होणार आहे.

×

Rate Your Experience